Niyamit Karj Mafi Yojana | 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादिवशी जमा होणार सहकार मंत्री पाटील यांची माहिती पहा पात्र शेतकरी यादी

 


नियमित कर्ज माफी योजना :-शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.
आणि त्याचीच अंमलबजावणी आता लवकरच येत्या 31 जून पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
नियमित कर्ज माफी योजना
दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२० पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील जवळपास २३ लाख शेतकरी त्यासाठी पात्र असून त्यांच्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करोत काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना | कर्जमाफी दिल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दौड लाखाची कर्जमाफी दिली. दीड लाखावरील थकबाकीदारांनाही एकरकमी परतफेड योजनेच्या माध्यमातून (ओटीएस) कर्जमाफी दिली. नियमित कर्जदारांना २५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले.
हे पण वाचा:-Maharashtra Voter List 2022 : नवी मतदार यादी झाली प्रसिद्ध ! पहा लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ?
त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून कर्जमाफी जाहीर केली. दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, पण अद्याप दोन लाखांवरील थकबाकीदारांचा निर्णय झालेला नाही.
आता कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ज्यांचे कर्ज ५० हजारांपेक्षा कमी आहे त्यांना कर्जाएवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
दोन लाखांवरील थकबाकीदारांणा कर्जमाफी देण्यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. पण आता नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. सर्व बँकांकडून सरकारला माहिती प्राप्त झाली असून आता काही दिवसांत ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी
त्यांचे कर्ज पन्नास हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्ज एवढीच रक्कम प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. जिल्हा माध्यमिक राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्याकडे नियमित कर्जदारांची यादी सहकार विभागाकडे सादर केलेली आहे. जून अखेर पर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित केले जाणार आहे

Leave a Comment